सातारा :किसन वीर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ विजयादशमीदिवशी आ. मकरंद पाटील आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत, कारखान्याच्या अनुषंगाने झालेल्या इतर वेगवेगळ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची २०२०-२१ मधील थकीत ऊस बील आम्ही देणार तसेच कारखानाही सुस्थितीत आणणार असे सांगत होतो. याबाबतचे पहिले पाऊल पडलेले असून वार्षिक मिटींगला दिलेल्या शब्दानुसार १५ ऑक्टोंबरपर्यंत २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल खात्यावर वर्ग करणार आहे. त्याची सुरूवात विजयादशमीच्या निमित्ताने शेतकऱ्यांना अॅडव्हाईस देऊन करत आहोत,असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन, आमदार मकरंद पाटील यांनी केले.
किसन वीर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन कारखान्याचे चेअरमन, आमदार मकरंद पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना मकरंद पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन, खासदार नितीन पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, बाळासाहेब सोळस्कर, दत्तानाना ढमाळ, रामराव लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील म्हणाले, आपल्याला मिळालेल्या थकहमीची परतफेड आठ वर्षांमध्ये करावयाची आहे. यासाठी दोन्ही कारखान्याचे मिळून दहा लाख मेट्रिक टन गाळप झाले पाहिजे. असे झाल्यास नजिकच्या ४ ते ५ वर्षात शेजारील सोमेश्वर कारखान्याचा जो भाव असेल तोच आपलाही असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिपक्व झालेला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला देऊन सहकार्य करावे.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, बबनराव साबळे, अजय कदम, संचालक अरविंद कदम, प्रतापराव पवार, विजय इथापे, नितीन निकम, रमेश गायकवाड, पोपट जगताप, भैय्यासाहेब डोंगरे, शुभम पवार, राजेंद्र सोनावणे, नारायण नलवडे, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.