विल्लुपुरम : खासगी कारखान्यांनी अलिकडेच शेतकऱ्यांना उसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) अदा केली आहे. त्यामुळे विल्लुपुरममधील शेतकरी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक आनंदात पोंगल सण साजरा करीत आहेत.
गेल्या पाच वर्षात कारखान्यांकडून एफआरपी दिली गेली नसल्याने या विभागातील किमान १०,००० शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे २०२० मध्ये एकूण ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांनी आपले पिक बदलले. विल्लुपुरम येखील शेतकरी ऊसाची शेती सोडून डाळी, भात, मटर, फुल, बाजरी या पिकांकडे वळले.
कारखान्यांकडून ऊस थकबाकी देण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना कुटूंब चालवणे अतिशय कठीण बनले होते. स्थानिक स्तरावर सावकारी वाढली होती. मात्र, एफआरपी मिळाल्याने शेतकरी आता तणावमुक्त पोंगल सण साजरा करू शकतात.
याबाबत, Newindianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, खासगी साखर कारखान्यांच्या सूत्रांनी एफआरपी उशीरा देण्याबाबत महसुलातील घट आणि लॉकडाउनला जबाबदार धरले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विल्लुपुरम आणि चेन्नईत साखर आयोगाकडून शेतकऱ्यांकडून अनेकवेळा आंदोलने झाल्यानंतर खासगी कारखान्यांनी डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पैसे दिले होते.