हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 8 ; राज्यातील 14 साखर कारखान्यांची साखर जप्त करा असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. या कारखान्यांनी 251 कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात एकूण 3 हजार 595 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. श्री गायकवाड यांनी या कारखान्याला नोटीस बजावली आहे.
सातारा किसनवीर प्रतापगड साखर कारखाना, विठ्ठल रिफाईड साखर कारखाना ( सोलापूर ), जय भवानी साखर कारखाना ( बीड ), रेणुका शुगर – रत्नप्रभा कारखाना ( सोलापूर ), बबनराव शिंदे साखर कारखाना ( सोलापूर ), जयहिंद साखर कारखाना, पणगेश्वर साखर कारखाना, जयलक्ष्मी – शीला अतुल साखर कारखाना ( उस्मानाबाद ),संत कुर्मदास साखर कारखाना ( सोलापूर ), त्रीधारा साखर कारखाना ( परभणी ), डेक्कन शुगर सागर साखर कारखाना ( यवतमाळ), गंगाखेड साखर कारखाना ( परभणी ), योगेश्वरी साखर कारखाना ( परभणी ) , अंबानी शुगर साखर कारखाना ( जळगाव ).