देशातील शेतकऱ्यांची ऊस बिल थकबाकी ५ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर : मीडिया रिपोर्ट्स

नवी दिल्ली : साखर निर्यातीने मारलेली उसळी आणि इथेनॉल उत्पादनातील वाढ यामुळे २०२१-२२ या वर्षी कारखान्यांकडून ऊस बिल थकबाकी ३० सप्टेंबर रोजी हंगामाच्या अखेरीस घटून ५,९१० कोटी रुपये झाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडील नव्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षातील ही सर्वात कमी थकबाकी आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आकडेवारीवरून दिसून येते की, २०२१-२२ या हंगामात शेतकऱ्यांकडून १.१८ लाख कोटी रुपयांच्या उसाची खरेदी करण्यात आली. यापैकी ३० सप्टेंबरपर्यंत १.१२ लाक कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.तर ५,९१० कोटी रुपये थकबाकी आहे. एकूण रक्कमेपैकी ही थकबाकी फक्त ५ टक्के आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक थकबाकी आहे. उत्तर प्रदेशात २०२१-२२ या हंगामात कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ३५,२०१ कोटी रुपयांपैकी ३१,२५८ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. गुजरातमध्ये २०२१-२२ या हंगामातील ३,८९१ कोटी रुपयांच्या एकूण देण्यापैकी शेतकऱ्यांना २,८९२ कोटी रुपयांची बिले मिळाली आहेत. तर १,०३५ कोटी रुपये म्हणजेच ३४.५ टक्के थकबाकी आहे.

कृषी मंत्रालयाने उसाच्या प्रजातींमध्ये बदल कला आहे. त्यामुळे उत्पादन आणि उताऱ्यामध्ये सुधारणा झाली आहे. आता उतारा जवळपास ११ टक्के आहे. आकडेवारीनुसार दिसून येते की, हंगाम २०१९-२० मधील १७१ कोटी लिटरवरून इथेनॉल पुरवठा २०२०-२१ मधील ३०२ कोटी लिटरपर्यंत पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here