सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम कारखान्याने संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली
अजिंक्यतारा कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत २८०६६.१६१ मे. टन उसाचे गाळप झाले. या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये याप्रमाणे होणारी रक्कम ८ कोटी ७० लाख ५ हजार १४१ रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहेत.