धाराशिव : जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. कारखान्याने ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या उसाचे बिल प्रती टन २५०० रुपये यांप्रमाणे अदा केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेत आणि उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत आहे त्या शेतकऱ्यांनी संबंधी बँकेत जाऊन बिल घ्यावे, असे आवाहनही चेअरमन पाटील यांनी केले.
चाचणी गळीत हंगामापेक्षा जास्त प्रतिसाद प्रथम गळीत हंगामात मिळाल्यामुळे यंदा सर्वाधिक ऊस गाळप होईल, असा विश्वासही चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी नानासाहेब पाटील यांनी एनव्हीपी शुगर प्रा.लि. कारखान्याची उभारणी केली. चाचणी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर दिला. यंदा प्रथम गळीत हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला दिला आहे. दिलेल्या आश्वासनानुसार एनव्हीपी शुगरने गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पंधरा दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.