जानीखुर्द :योगी सरकारच्या कार्यकाळात ऊसाचे वेळेवर आणि उच्चांकी बिले देण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊस मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी केले. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी, अडचणी सोडविण्यासाठी सदैव कार्यरत आहे असे त्यांनी सांगितले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी आमदार जगत सिंह यांच्या कार्यक्रमाला ऊस मंत्री चौधरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी वृक्षारोपण केले. ते म्हणाले की, वृक्ष आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. रसूलपूर धौलडी येथील शौकतअली बागेतील या कार्यक्रम प्रसंगी मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. धौलडी येथे कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी त्यांनी बागेत वृक्षारोपण केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, आधीच्या सरकारांच्या काळात भाजप सरकारने शेतकऱ्यांची स्थिती सुधारली आहे. ऊसाची बिले वेळेवर दिली जात आहेत. आधीची, थकीत बिले देण्यासाठी काम केले जात आहे. यावेळी माजी आमदार जगत सिंह, भाजप जिल्हाध्यक्ष विमल शर्मा, राहुल प्रमुख, योगेन्द्र, सुरेंद्र, अरविंद्र सांगवान, बाबर अली, सुखपाल आदी उपस्थित होते.