बुलंदशहर : त्रिवेणी ग्रुपच्या साबितगढ साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या कारखान्याने १६ एप्रिलअखेर १७ कोटी १२ लाक रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहेत.
लाईव्ह हिंदुस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदाच्या हंगामात काही मोजक्याच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिले मिळावीत, यासाठी नियोजन केले आहे. पैसे वेळेत दिले जावेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याबाबत साबितगढ साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक प्रदीप खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामात १६ एप्रिल अखेरपर्यंतची ऊस बिले देण्यात आली आहेत. एकूण १७ कोटी १२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते वरचेवर तपासावे, तरच जमा झालेल्या पैशाविषयी माहिती मिळू शकेल.