मवाना : मवाना साखर कारखान्याने नव्या गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १७ फेब्रुवारी २०२३ अखेर खरेदी करण्यात आलेल्या ऊसापोटी ३४.४७ कोटी रुपये संबंधित समित्यांना पाठविण्यात आले आहे. मवाना सहकारी ऊस विकास समितीचे सचिव नरेश कुमार यांनी सांगितले की, दोन दिवसांत सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये तीन मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण १३६.५८ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. तर आतापर्यंत एकूण ४११.५४ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. ही माहिती देताना मवाना कारखान्याचे ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, वसंत ऋतुतील ऊस लागणीत को ०११८, को १५०२३, कोशा १३२३५ आणि कोएल १४२०१ या प्रजातींचा वापर करावा. कारखान्यांच्या खरेदी केंद्रांवर ॲडव्हान्स उसाचा पुरवठा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.