मेरठ : मवाना साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये शुक्रवारी, २ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी ३६.५८ कोटी रुपयांची बिले संबंधीत समित्यांना पाठवली आहेत. मवाना सहकारी ऊस समितीचे सचिव नरेश कुमार यांनी सांगितले की, ही ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी विभागातील शेतकऱ्यांनी तोडणी पावती अथवा एसएमएस मिळाल्यानंतरच ऊस तोडणी करावी असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या गेटवर अथवा ऊस खरेदी केंद्रात साफ, ताज्या उसाचा पुरवठा करावा. केंद्रांवर आधीच ऊस आणून ठेवू नये. अशा उसाची जबाबदारी साखर कारखाना अथवा ऊस समित्यांकडून घेतली जाणार नाही.