मवाना : मवाना साखर कारखान्याच्यावतीने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये दहा नोव्हेंबरपर्यंत झालेल्या ऊसापोटी १९.२८ कोटी रुपयांची बिले संबंधीत ऊस समित्यांना पाठविण्यात आली आहेत. मवाना साखर कारखान्याने खरेदी केंद्रांवर दोन नोव्हेंबरपासून आणि कारखान्याच्या गेटवर चार नोव्हेंबरपासून ऊस खरेदीस सुरूवात केली होती. या नव्या गळीत हंगामात पहिल्यांदाच ऊस बिले अदा करण्यात आली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत मवाना साखर कारखान्याने २०.६६ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. याचा साखर उतारा ९.०२ टक्के आहे. गळीत हंगाम २०२१-२२ च्या तुलनेत साखर उतारा १.०२ टक्क्यांनी कमी आहे. कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी एसएमएस आल्यावरच ऊस तोडणी करावी. स्वच्छ आणि साफ ऊस पुरवठा करावा. तसेच खरेदी केंद्रांवर आगोदरच ऊस पुरवठा करू नये असे आवाहन त्यांनी केले. सर्व केंद्रांवर आणि कारखाना गेटवर नियमित ऊस खरेदी सुरू असल्याचे ते म्हणाले.