पहासू : साबितगढ येथील त्रिवेणी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १८ डिसेंबर २०२२ अखेर गाळपास दिलेल्या ऊसाचे बिल अदा केले आहे. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १७ कोटी ५० लाख रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, साबितगढ साखर कारखान्याच्या वतीने उसाचे पैसे जमा केल्याने आम्हाला दैनंदिन गरजा भागविण्यास खूप मोलाची मदत झाली आहे. कारखान्याच्या या युनिटचे प्रमुख प्रदीप खंडेलवाल यांनी सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्याला असेच सहकार्य सुरू ठेवावे आणि साफ, स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा असे आवाहन खंडेलवाल यांनी केले आहे.