आगीत शेतातील दीड लाखांचे ऊस, गव्हाचे पिक भस्मसात

खेतिया (मध्य प्रदेश) : बडवानी जिल्ह्यातील खेतिया गावात शेतातील उभ्या गहू आणि ऊस पिकाला आग लागली. या आगीत सर्वच पिक जळून खाक झाले. शेतावरून जाणाऱ्या ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचे कारण सांगितले जात आहे.

आगीत नष्ट झालेल्या पिकाची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. शेताचे मालक विशाल पटेल आणि विनोद पटेल यांनी सांगितले की, गहू तसेच उसाचे तयार पिक ओव्हरहेड तारांमधील शॉर्ट-सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच अतिरिक्त तहसीलदार हुकूम सिंह निगवाल यांनी महसूल विभागाच्या पथकासोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली. याचा पंचनामा करून आगीच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here