सीतापूर, उत्तर प्रदेश: क्षेत्रामध्ये ऊस शेतकरी रेड रॉट रोगामुळे प्रभावित आहेत. ज्या शेतामध्ये हा रोग लागला आहे तिथे पीक वाळून जात आहे. रेड रॉट ला कृषी वैज्ञानिक ऊस पीकाचा कॅन्सर असे संबोधतात. यावर कोणताही उपचार नाही. ज्या शेतात हा रोग लागतो, ते पीक वाळून खराब होते. गेल्या काही दिवसांमध्ये साखर कारखाना अधिकार्यांनी क्षेत्राचा सर्वे केला होता. शेतकर्यांना जागरुक करताना रोगाने प्रभावित असलेल्या शेतातील ऊसाच्या बिया लागवडीसाठी प्रयोगात आणू नये, ही माहिती दिली होती.
क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन होते. रोगाबाबत शेतकरी हवालदिल आहेत. हा रोग लागल्यावर ऊसाची पाने पिवळी पडतात. त्याचा देठ वाळून जातो, ही सुरुवातीची लक्षणे आहेत. जबरपुरवा येथील शेतकरी फजल अहमद यांनी सांगितले की, सहा एकर जमीनीत ऊस लागवड केली होती. यामध्ये रेड रॉट लागला आहे, पीक वाळून जात आहे. कारखाना कर्मचार्यांनी सर्वे करुन औषध फवारणी करण्यासाठी सांगितले होते. औषध वापरले पण परिणाम होत नाही. जबरपुरवा येथील मंगली च्या पाच एकर, ग्वारी च्या राम प्रसाद यांच्या तीन एकर जमिनीतील ऊसावर रोगामुळे परिणाम झाला आहे. क्षेत्रामध्ये अनेक शेतकर्यांच्या शेतामध्ये रोग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सेक्सरिया साखर कारखान्याचे सीडीओ सचिन कुमार यांनी सांगितले की, सातत्याने पाणी भरल्यामुळे ऊसामध्ये रेड रॉट रोग लागला आहे. शेतकर्यांनी पीकाची देखभाल करणे कायम ठेवावे. कीटकनाशक फ़वारणी करावी. अशा ऊसाचे बी प्रयोगात आणू नये.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.