अंकली : कृष्णा नदीतील पाणी उपसावर शासनाने बंदी घातली आहे. एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसऱ्या बाजूला शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने समस्येत वाढ होत आहे. वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांचे उपसाबंदीमुळे विद्युत मंडळाने अतोनात हाल होत आहेत. शासनाने कृष्णा नदीवरील उपसा बंदी आगे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
कृष्णा, दूधगंगा, पंचगंगा व वेदगंगा नद्यांना महाराष्ट्रातील धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे चिकोडी उपविभाग परिसरातील ७० टक्के जमीन ओलिताखाली आली आहे. नदीच्या पाण्यावर अनेक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत. पाणी उपसा करून जवळपास आठ- दहा कि. मी. पर्यंत क्षेत्रातील गावे ओलिताखाली आणली आहेत. मात्र, मागील काही वर्षापेक्षा गतवर्षी पडलेला कमी पाऊस कमी पडलेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या परिसरातील नद्या, नाले, विहीर व नाले आणिया सर्वांमुळे कृष्णा नदीकाठावरील पिके धोक्यात आली आहे. पिकांना पाणी देणे कठीण बनल्याने ऊस पीक वाळत आहे. त्यामुळे उपसाबंदी मागे घेण्यासह जादा वीज पुरवठा करण्यासाठी परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. तरीही पिण्याच्या पाण्यासाठी कमतरता न भासण्यासाठी शासनाने उपसाबंदीचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे शेती पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे.