बुलंदशहर : ऊस विभागाने आगामी २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊस पिकाच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी केले आहेत. हा सर्व्हे एक मेपासून सुरू होणार आहे. जीपीएसच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. विभागाने आदेश मिळाल्यानंतर याची तयारी सुरू केली आहे. एक मेपासून ३० जूनपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व्हेला साखर कारखान्यांकडूनही सहकार्य केले जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या गळीत हंगाम सुरू आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील साखर कारखाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील अशी शक्यता आहे. दरम्यान, ऊस विभागाने आगामी हंगामाची तयारी सुरू केली आहे. ऊस विभागाने दिलेल्या आदेशानुसार, आगामी हंगामासाठीच्या ऊस पिकाचा सर्व्हे करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागीय अधिकारी, साखर कारखान्यांनी आपली तयारी पूर्ण करावी.
जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी हंगामासाठीच्या सर्व्हेचे आदेश मिळाले आहेत. आता तयारी सुरू आहे. साखर कारखान्यांचेही यासाठी सहकार्य असेल. जीपीएसच्या आधारावर हा सर्व्हे होईल. सर्व्हे करताना शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकाविषयीची माहिती घेतली जाईल. ती माहिती इन्क्वायरी डॉट केन डॉट यूपी या माध्यमातून ऑनलाइन भरली जाईल. सर्व्हेवेळी त्या माहितीची खातरजमा होईल. हा सर्व्हे पारदर्शक केला जाईल. यात कोणताही घोटाळा अथवा टाळाटाळ खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ऊसाच्या सर्व्हेचे आदेश मिळाले आहेत. त्यांचे पालन केले जाईल. विभागाने तयारी सुरू केल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी दिली.