महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप, गेल्या वर्षीपेक्षा जादा कारखाने

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळप आणि साखर उत्पादन सुरळीत चालू आहे. या हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाष्ट्रात एकूण १९७ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखाने कार्यरत आहेत. ७३३.१६ लाख टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ७३३.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन सुरू आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा १०.०७ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापुर विभागात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४६ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. येथे १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १७४.०७ लाख क्विंटल ऊस गाळप झाले असून १५७.८६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

राज्यात सर्वात अधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात एकूण १७४.१५ लाख टन ऊस गाळप करून १९९.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथे साखर उतारा ११.४७ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here