या जिल्हातील वीस साखर कारखान्यांचा हंगाम संपला

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर, दि. 13 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत 38 साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू राहिले. या सर्व साखर कारखान्यांनी या वर्षीच्या हंगामामध्ये 24 लाख 95 हजार मेट्रीक टन साखर उत्पादन केले आहे. दरम्यान आतापर्यंत कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील सुमारे 20 कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापुरातील काही कारखाने सुरू आहेत.  तर सांगलीत काही कारखाने अजून चार-पाच दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्यावर्षी राज्यात राज्यात 185 साखर कारखान्यांनी हंगाम घेऊन 11 मार्च अखेर 88 लाख 60 हजार मेट्रिक टन साखर उत्पादित केली होती. या वर्षी राज्यात 195 साखर कारखान्यांनी हंगाम घेऊन 98.40 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे, या वर्षी आतापर्यंत 67 साखर कारखाने बंद झाले आहेत. तरी गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 16 साखर कारखाने बंद होते अजूनही सुमारे 145 साखर कारखाने हंगाम सुरू आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here