पुणे: महाराष्ट्रातील गाळप हंगाम २०२०-२१ची गुरुवारी समाप्ती झाली. चालू गळीत हंगामात १९० कारखाने चालू होते. त्यापैकी ९५ सहकारी तर ९५ खासगी कारखाने होते. त्यांची एकूण गाळप क्षमता ७,२८,४८० मेट्रिक टन होती. गेल्या वर्षी गळीत हंगामातील ५४५ लाख टनाच्या तुलनेत चालू हंगामात १०१२ लाख टन गाळप झाले.
राज्यात कारखान्यांनी १०६.२८ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ते अधिक आहे. यामध्ये सरासरी साखर उतारा १०.५ टक्के होता. तर गेल्या हंगामात ऊस कमी असल्याने फक्त १४८ कारखाने सुरू होते आणि या कारखान्यांनी ६१.६१ लाख टन साखर उत्पादन केले होते.
गेल्या वर्षीच्या १२७ दिवसांच्या तुलनेत चालू हंगाम १४० दिवसांचा राहीला. सर्व जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात गाळप सर्वाधिक १५८ दिवस सुरू राहिले. तर नागपूरमध्ये सर्वात कमी १२८ दिवसांचा हंगाम राहीला. राज्यात २०८ दिवस एका कारखान्याचा गाळप हंगाम सर्वाधिक दिवस होता. तर एका कारखान्याचा हंगाम सर्वात कमी २८ दिवस होता.
सर्वाधिक ऊस गाळप – जवाहर शेतकारी सहकारी साखर कारखाना, हुपरी – १८.८८ लाख टन
सर्वाधिक साखर उत्पादन – जवाहर शेतकारी सहकारी साखर कारखाना, हुपरी – २२.९२ लाख क्विंटल
सर्वाधिक साखर उतारा – डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड – १३.३९ प्रतिशत
सर्वाधिक दिवस गाळप – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना – २०८ दिवस
सर्वाधिक एफआरपी वितरण – सोनहिरा साखर कारखाना – ३१७६ रुपये /मेट्रिक टन
सर्वाधिक उसाचे बिल वितरण – जवाहर शेतकारी सहकारी साखर कारखाना, हुपरी – ५२८.६८ कोटी रुपये