दुरुस्तीनंतर साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरू, शेतकऱ्यांमध्ये समाधान

कायमगंज : तांत्रिक कारणांमुळे वारंवार बंद पडलेल्या साखर कारखान्यामध्ये अनुप शहरमधून आलेल्या पथकाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर उसाचे गाळप सुरू झाले. ऊसाचे वजन करण्यास गती आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एका आठवड्यापासून प्रलंबित राहिलेले गाळप आता सुरू झाले आहे. साखर कारखान्याने २६ नोव्हेंबर रोजी गळीत हंगामास सुरुवात केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे गाळपामध्ये अडथळे येत होते. गुरुवारीही टर्बाइनच्या ऑईल पंपात आणि इलेक्ट्रॉनिक पॅनलमध्ये बिघाड झाल्याने गाळप ठप्प झाले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना प्रशासनाने पोलिसांसोबत शेतकऱ्यांशी चर्चा करून ३६ तासांची मुदत मागितली. त्यानंतर दुरुस्तीसाठी अनुप शहर मधून तांत्रिक कर्मचारी आले. त्याशिवाय पुरनपूरमधून टर्बाइनचा ऑइल पंपही घेण्यात आला. दुरुस्ती पूर्ण करून रात्री प्लांट सुरू करण्यात आला. त्यानंतर गाळप नियमित सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याचे सीसीओ प्रमोद यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना स्वच्छ ऊस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सात डिसेंबरपर्यंत एक लाख आठ हजार क्विंटल उसाचे इंडेंट देण्यात आले आहे. प्लांट बंद पडेपर्यंत १३,३०० क्विंटल उसाचे वजन आणि ८,४०० क्विंटल गाळप करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here