यमुनानगर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

यमुनानगर : ऊस उत्पादकांना दिलासा मिळाल्यामुळे सरस्वती साखर कारखान्याने आज गाळप सुरु केला असून, यंदा 160 लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. सचदेवा यांनी याची पुष्टी केली.  यमुनानगर व आसपासच्या जिल्ह्यातील जवळपास 25,000 शेतकरी सरस्वती साखर कारखान्याला आपला ऊस पुरवतात. यमुनानगर ऊस पिकाचे केंद्र असल्यामुळे हा कारखाना शेतकर्‍यांच्या आयुष्याशी निगडित आहे.

शेतकर्‍यांची उपजिविका या कारखान्यावर अवलंबून असल्याचे देवधर गाचे ऊस उत्पादक प्रेमचंद शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, हे सारेच वातावरण शेतकर्‍यांसाठी दिलासादायक आहे. ऊसानंतर आता शेतकरी गव्हाचे पिकही घेवू शकतील. कारखान्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष डीपी सिंग यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 166 लाख क्विंटल गाळप झाले होते. कारखान्याने शेतकर्‍यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी खेड्यांमध्ये 42 खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. त्याशिवाय कारखान्यावरही थेट ऊस पुरवठा करता येतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here