बागपत : दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रमाला सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण केले होते. या साखर कारखआन्याने आता स्वतःच्या गाळपानंतर बागपत साखर कारखान्याच्या उसाचे गाळप सुरू केले आहे. राज्यात साखर कारखाना दररोज ५० हजार क्विंटल गाळप करून प्रथम क्रमांकावर आहे हे विशेष.
रमाला साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. व्ही. राम यांनी सांगितले की, चालू गळीत हंगामात साखर कारखान्यासमोर ८६.६० लाख क्विंटलचे उद्दीष्ट होते. मात्र, कारखान्याने निर्धारीत वेळेत २५ मे रोजी आपल्या उद्दीष्टानंतर ९७.२३ लाख क्विंटलचे गाळप केले. यावेळी गाळप चार नोव्हेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आले होते. साखर कारखान्याने ५५,८०० क्विंटल साखर उत्पादन केले. बागपत साखर कारखाना सध्या बंद आहे. त्या कारखान्याच्या सर्व शेतकऱ्यांचे गाळप पूर्ण व्हावे यासाठी रमाला कारखान्याकडूनच गाळप केले जात आहे. आतापर्यत १५ हजार क्विंटलचे गाळप झाले आहे. अद्याप पावणेदोन लाख क्विंटलचे गाळप शिल्लक आहे. दररोजच्या गाळप क्षमतेत रमाला कारखाना राज्यात सहकारी विभागात पहिल्या क्रमांकावर आहे.