मैसुर: भाजपा आमदार आणि निरानी समूहाच्या कंपनीचे अध्यक्ष मुरुगेश निरानी यांनी बुधवारी मैसुरचे सुत्तुर मठाचे महंत शिवरात्री देशिकेंद्र स्वामीजी यांची भेट घेतली. आणि पांडवपुरा साखर कारखान्याच्या पुन: उद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित केले. पांडवपुरा साखर कारखान्याचे पुन: उद्धाटन 11 ऑगस्ट ला केले जाणार आहे.
दशकांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याला वाढत्या नुकसानीमुळे काही वषापूर्वी बंद करण्यात आले होते. ज्यानंतर सकरकार ने कारखाना चालवण्यासाठी खाजगी कंपनीला आमंत्रित केले. त्यानंतर कोठारी शुगर्स कारखान्याला चालवण्यासाठी पुढे आले, पण ते कारखाना चालवू शकले नाहीत. आणि त्यानंतर कारखाना पुन्हा बंद करण्यात आला. पांडवपुरा साखर कारखान्यामध्ये ऊसाचे गाळप 11 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. निरानी शुगर्स ने सध्या 40 वर्षाच्या अवधीसाठी कारखान्याच्या संचालनासाठी बोली जिंकली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.