सातारा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्र वाढले, मात्र उत्पादन घटणार

सातारा : जिल्ह्यात यंदा उसाच्या लागवड क्षेत्रात ९ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने उसाचा उतारा घटेल, अशी शक्यता आहे. बंद असलेला प्रतापगड कारखाना यंदा पुन्हा सुरू झाल्याने जिल्ह्यात १६ कारखाने गाळप करतील हे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात खासगी व सहकारी अशा १५ कारखान्यांनी गाळप केले होते. जावळीतील प्रतापगड कारखाना यंदा अजिंक्यतारा कारखान्याने चालवायला घेतला आहे. त्यामुळे या कारखान्यालाही उसाची गरज भासेल. त्यामुळे वाई व जावळीत ऊस मिळविण्यासाठी कारखआन्यांमध्ये स्पर्धा राहील.

दरम्यान, यंदा पावसाने ओढ दिल्याने उसाचे उत्पादन घटल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये ९ हजार हेक्टरमध्ये जादा उसाची लागवड झाली आहे. तरीही पुरेसे उत्पादन मिळेल अशी शक्यता नाही. सातारा जिल्ह्याची दैनंदिन गाळप क्षमता ही सुमारे ५५ हजार मेट्रिक टन आहे. दररोज एवढा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. पाऊस नसल्याने उसावरील रोग वाढू लागले आहे. उसाचे वजन घटले आहे. रोग पडल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कारखान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जादा दर देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील कारखानदार अशी स्पर्धा करतील का याविषयी साशंकता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here