पुढील वर्षी कोल्हापूर विभागात दोन कोटी पन्नास लाख टन ऊस उत्पादन

कोल्हापुरात 146 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट

कोल्हापूर, दि. 27 जून 2018: कोल्हापूर विभागातील पुढील वर्षीच्या (2018-19) गळीत हंगामात 2 कोटी 50 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये केवळ कोल्हापूरमध्ये 146 लाख टन ऊस गाळप होईल असा अंदाज आहे. यावर्षी पेक्षा हे उत्पादन 30 ते 40 हजार टनाने वाढणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेला पाऊस उसासाठी समाधानकारक आणि पोषक आहे. चार महिने पाऊस असाच राहिला तर ऊस उत्पादनात निषेध होणे वाढ होणार आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागात 38 साखर कारखान्यांनी आपला हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला. या हंगामात 2 कोटी 30 लाख टनापर्यंत विक्रमी उसाचे गाळप झाले आहे. या उसाला सरसरी 12.41 उतारा मिळाला. तसेच सरासरी साखर उताऱ्यासह 2 कोटी 90 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूरमध्ये ऊस गाळपात जवाहर-हुपरीने आघाडी घेतली आहे. गुरुदत्त-टाकळीने सरासरी 13.50 टक्के साखर उतारा मिळवत उताऱ्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी.च्या 80 टक्के पहिला हप्ता दिला आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही दिली आहे.

यावर्षी (2017-18)कोल्हापूर जिल्ह्यातील 23 पैकी 21 साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण करत एक कोटी 45 लाख टनापर्यंत उसाचे गाळप केले आहे. यामध्ये सरासरी 12.16 प्रमाणे साखर उताऱ्यासह एक कोटी 82 लाख 70 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 64 लाख 48 हजार टन उसाचे गाळप केले आहे. 12.19च्या सरासरी साखर उताऱ्यासह 78 लाख 57 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

पुढील गळीत (2018-19)हंगामात ऊस आणखी वाढण्याची शक्यता असल्याने साखर दराचा किंवा उसाचा प्रश्न कायम राहणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here