पुणे विभागात अवघ्या ३ लाख हेक्टरवर ऊस लागवड

पुणे : पुणे विभागात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या तीन लाख २ हजार ७७९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. त्यातच सध्याचा ऊस चाऱ्यासाठी जाणार असल्याने साखर कारखान्यांचा पुढील गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. विभागात सरासरीच्या तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टरपैकी तीन लाख २ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. सद्यस्थितीत ऊस लागवडी ठप्प असल्याचे चित्र आहे.

नगर जिल्ह्यात शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. सुरू हंगामात सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० हजार ६१३ हेक्टरने ऊस लागवडी घटल्या आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाख २४ हजार ३१२ हेक्टर खोडवा ऊस शेतकऱ्यांनी ठेवला आहे. तर पुणे विभागात आडसाली उसाची एक लाख ८ हजार ९६ हेक्टरवर, पूर्वहंगामाची ५१ हजार ७४५ हेक्टर ऊस लागवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here