सोलापूर : जिल्ह्यातील भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल साखर कारखान्यातर्फे पुढील हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक कराराला प्रारंभ करण्यात आला. कारखाना प्रशासनाने यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, कारखान्याने २०२३ गळीत हंगामातील ऊस खरेदीची १०० टक्के एफआरपी अदा करण्यात कारखाना प्रशासनाला यश आले आहे. कारखान्याच्या १७ व्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ऊस लागवडीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी चेअरमन महेश देशमुख, दीपक नलावडे, श्रीशैल लोखंडे आदी उपस्थित होते.