सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणी टोळ्यांची पळवापळवी

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांची मराठवाड्यातील मुकादमांनी ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या ट्रॅक्टर मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. टोळ्या देतो असे सांगून बीड, धुळे, परभणी, नंदुरबार, जळगावसह या भागातील अनेक मुकादमांनी ट्रॅक्टर चालकांकडून लाखो रुपये उचलले. मात्र, तोडणीसाठी टोळी न आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर मालकांनी या मुकादमांना ऑनलाइन आणि फोन पेच्या माध्यमातून पैसे दिले. तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनेक ट्रॅक्टर मालक गरीब असून कारखाने आणि फायनान्स कंपन्या त्यांच्याकडे पैसे मागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here