कुंभी कासारी कारखान्यात ऊस तोडणी वाहतूक करार

कोल्हापूर : हंगाम २०२४- २५ करिता सर्व वाहनधारकांनी सक्षम तोडणी यंत्रणा राबवून कारखान्याला गाळप क्षमतेएवढा दररोज ऊसपुरवठा करावा, असे आवाहन कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कारखान्याच्या आगामी २०२४- २५च्या हंगामासाठी ऊसतोडणी कराराचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी व ऊस तोडणी यंत्र कराराचा प्रारंभ करण्यात आला.

चेअरमन नरके म्हणाले की, गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचा मोठा वाटा असतो. हंगाम संपेपर्यंत सर्वांनी हातभार लावावा. ऊस उत्पादकांना संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठविण्यासाठी या यंत्रणेने सहकार्य करावे. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, मुख्य शेती अधिकारी संजय साळवी, वाहतूक प्रतिनिधी दत्तात्रय पाटील, भीमराव शेलार, विजय पाटील, अशोक पाटील, मच्छिंद्र मडके, सचिन पाटील, निवास जरग, रघुनाथ मांगोरे, विलास चव्हाण यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here