सांगली : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शन आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखाना २०२४-२५ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करेल. आमच्याकडे ५० हजार एकराच्यावर उसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत आणि कार्यक्रमाप्रमाणे तुटण्यासाठी आम्ही पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार करणार आहोत, असे प्रतिपादन कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ साठी तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, प्रदीपकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, रघुनाथ जाधव, शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तोडणी व वाहतूक कंत्राटदारांच्या अडी-अडचणी समजून घेण्यात आल्या. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी स्वागत केले. संचालिका मेघा पाटील, डॉ. योजना शिंदे पाटील, संचालक प्रताप पाटील, दादासाहेब मोरे, बबनराव थोटे, शैलेश पाटील, अतुल पाटील, दीपक पाटील, दिलीपराव देसाई, रामराव पाटील, रमेश हाके, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, वैभव रकटे, मनोहर सन्मुख, विकास पवार, विजय मोरे, संतोष खटावकर आदी उपस्थित होते. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.