ऊस तोडणी कामगारांना नोव्हेंबर २०२३ पासून मिळणार वाढीव मजुरी

अहमदनगर : ऊस तोडणी मजुरांना यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच (नोव्हेंबर) नव्या करारानुसार दरवाढ मिळणार आहे. नव्या करारामुळे राज्यातील बारा लाख ऊसतोड कामगारांना वाढीव रक्कम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोड तोडणी वाहतूक, कामगार, मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी ही माहिती दिली. तोडणी मजुरीत दरात ३४ टक्के वाढ झाली आहे. ४ जानेवारी २०२४ ला हा करार झाला आहे.

थोरे पाटील यांनी सांगितले की, गेल्या ३५ वर्षांत ३५० रुपयांपासून ४२० रुपयांपर्यंत प्रती टनामागे दरवाढ मिळाली असल्याचे थोरे म्हणाले. यंदा मजुरीत वाढीसाठी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दरवाढीत ४० टक्क्यांवर ऊसतोड कामगारांचे नेते ठाम राहिल्याने एकमत होऊन ३४ टक्के दरवाढ निश्‍चित झाली. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत यावर तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ होण्यासाठी दर तीन वर्षांनी करार होत असतो. आतापर्यंत बारा वेळा दरवाढ झाली बहुतांश वेळा शरद पवार, गोपीनाथ मुंडे, बबनराव ढाकणे यांचा पुढाकार राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here