पिलिभीत : सहकारी ऊस विकास समितीच्यावतीने संचलित खत गोदामांना ऊसाच्या ॲग्रो क्लिनिकच्या रुपात विकसित केली जाणार आहेत. येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन मिळेल. जिल्ह्यात अशी १७ ॲग्रो क्लिनिक सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील ऊस विकास समितीच्यावतीने पिलिभीत, मझोला, पुरनपूर, बिसलपूरमध्ये खत गोदामे संचलित केली जातात. येथे शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जाते. तेथे ऊस ॲग्रो क्लिनिक सुरू केली जातात. जिल्ह्यात १७ ॲग्रो क्लिनीक सुरू होतील. यामध्ये पिलीभीत समिती, मझोला, बरखेडा, बदलेपूर, बिलसंडा, पिलीभीत साखर कारखाना कार्यक्षेत्रात पाच ठिकाणी, अमरिया, गजरौली, खमरिया पूल या ठिकाणांचा समावेश आहे.
जिल्हा ऊस अधिकारी खुशीराम यांनी सांगितले की, ॲग्रो क्लिनीकमध्ये शेतकऱ्यांना खते मिळण्यासह तेथील पर्यवेक्षक मार्गदर्शन करतील. त्याचा लाभ जिल्ह्यातील अडीच लाख कुटूंबांना मिळेल. हे क्लिनिक लवकरच सुरू केले जातील.