लातूर : वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण आणि ऊस विकास परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या परिषदेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट (पुणे) येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास व्हा. चेअरमन रवीद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ व मुख्य जनसंपर्क अधिकारी आर. बी. भोईटे, वरिष्ठ शाखज्ञ डॉ. एस. जी. दळवी, डॉ. जी. आर. पवार, वरिष्ठ ऊसरोग विकृती शाखज्ञ डॉ. जी. एस. कोटगीरे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन डिग्रसे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तज्ज्ञांनी ऊस लागवड, निंदणी, पाणी व्यवस्थापन, खते व्यवस्थापन, कीटकनाशक व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, ऊस तोडणी आणि ऊस गाळप या विषयांवर ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ऊस शेतीत वेळेनुसार होणारे बदल आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून ऊस उत्पादन कसे वाढवता येतील, याबद्दल ऊस उत्पादकांना माहिती दिली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले. अभार यावेळी ऊस विकास अधिकारी जहागीरदार सी. एम., शेतकी अधिकारी आनेराये एस. एस., कृषी पर्यवेक्षक सोमासे, देसाई, मेंढेकर, पाटील, नवनाथ पाटील, कदम आदी उपस्थित होते. एस. डी. नरवडे यांनी मानले.