पटना: बिहारचे ऊस उद्याग विभागाचे मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले की राज्यात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न सूरू ठेवले आहेत. साखर उद्योगात येणाऱ्या नव उद्योजकांचे स्वागत केले जाईल असे त्यांनी सांगितले.
मंत्री प्रमोद कुमार म्हणाले, जे नवे उद्योजक येतील त्यांचे स्वागत केले जाईल. बिहारमध्ये त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. येथील इथेनॉल उत्पादनाचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाला गती देतील. नवे साखर कारखाने आणि जुन्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे असे मंत्री प्रमोद कुमार म्हणाले.
गुंतवणूकदाराला जमीन उपलब्ध करून दिली जाईल. साखर उत्पादनासाठी १० कोटी रुपये, इथेनॉलसाठी ५ कोटी रुपये तसेच वीज निर्मिती प्रकल्पांसाठी १० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल असे धोरण सरकारने आखले आहे. बंद पडलेले कारखाने हे आधीच्या सरकारमुळे घडले आहे. ते सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. नव्या गुंतवणूकदारांचा शोध सुरू आहे असे मंत्री म्हणाले.