हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांची ऊस थकबाकी अजूनहि दिली गेलेली नाही अशी तक्रार ऊस शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्यांकड़ून ऊस थकबाकी देण्यात खूप अडचणी येत आहेत. त्यात एकट्या बेळगाव जिल्ह्यामध्ये २४ कारखान्यांकडून १,१८२ कोटी देणे आहे.
या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटक चे साखर आयुक्त के. जी . शांताराम यांना भेटले तर त्यांनी नोटीस काडून जर सात दिवसाच्या आत ऊस थकबाकी दिली नाही तर जप्ती ची कारवाई करू असे आश्वासन दिले होते. पण या गोष्टी ला ४ महिने उलटून सुद्धा कर्नाटक सरकार कडून कोणतीही कारवाही झाली नाही अशी तक्रार उस शेतकऱ्यांनी केली
आज पर्यंत कोणत्याही कारखान्याने FRP नुसार दर दिलेला नाही. १७- १८ मधल्या गाळप हंगामात सुद्धा २९०० प्रति टन दर ठरला होता परंतु कारखान्यायनी नोव्हेंबर पर्यंतच २९०० रुपयांनी दर दिला आणि १ डिसेंबर नंतर २५०० ने दिला यात शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले, असा आरोप कागवाड गावातील ऊस शेतकरी शशिकांत जोशी यांनी केला.
या पूर्ण प्रक्रिये मध्ये पारदर्शकपणा यावा अशी मागणी होत आहे. या सोबतच ऊस शेतकऱ्यांमध्ये जागृकता असा प्रयत्न चालला आहे.
ज्या गतीने महाराष्ट्रा मध्ये उस थकबाकी भागवली जाते त्याच गतीने कर्नाटक मध्ये सुद्धा ऊस थकबाकी भागवली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे .