हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
रामपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक उपाय केले आहेत. पण, अजूनही शेतकऱ्यांची चिंता कमी झालेली नाही. साखर कारखान्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतांमध्येच पडून आहे. मुळात पंचक्रोशीमध्ये एकही क्षेत्र असे नाही की जिथे ऊस उत्पादन वाढलेले नाही. त्यामुळे आता ऊस उत्पादकांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. परिसरात असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. आता या वाढीव लागवडीमुळे शेतकरी चिंतेत आहे.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांकडे जादा ऊस आहे हेच त्यांच्यासाठी चिंतेचे कारण आहे. रामपूरचा विचरा केला तर, यावर्षी उसाचा कोटा ७२ लाख क्विंटल होता. आणि उत्पादन ८९ लाख क्विंटल झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही हे उत्पादन जास्त आहे. स्वार पंचक्रोशीत यंदाचा कोटा ४६ लाख क्विंटल होता. तर, प्रत्यक्ष उत्पादन ६१ लाख क्विंटल आहे. बिलासपूरमध्ये यंदा २१.६७ लाख क्विंटल कोटा होता. तर, उत्पादन ३२ लाख क्विंटल झाले आहे. मिलकमध्ये ३३ लाख क्विंटल कोटा असताना उत्पादन ३९ लाख क्विंटल झाले. हे आकडेच गेल्या वर्षी पेक्षा जास्त ऊस लागवड झाल्याचे सांगत आहेत. तुलनेत त्यांच्या कारखान्यांचा बेसिक कोटा कमी आहे. आता कारखान्याला त्याच्या बेसिक कोट्यानुसार ऊस दिल्यानंतर शेतांमध्ये उरलेल्या उसाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
जिल्ह्याच्या ऊस विभागाने मात्र, शेतकऱ्यांचा सगळा ऊस कारखान्यांमध्ये घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. जोपर्यंत शेतांमधील सर्व ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. तोपर्यंत कारखाने बंद केले जाणार नाहीत, असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन सहाय्यक जिल्हा ऊस अधिकारी हेमराज यांनी केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp