पुणे : चीनीमंडी
मंत्री स्तरीय समितीने निश्चित केलेल्या तारखेनंतरच महाराष्ट्रात साखर कारखाने सुरु होऊ शकतात. या समितीचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. महाराष्ट्रात स्थिर सरकार नाही, त्यामुळे राज्यातील साखर कारखाने सुरु होऊ शकलेले नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने गाळप हंगामास उशिर होत आहे. यामुळे ऊस शेतकरी अडचणीत आहेत, माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाना परिसरातल्या ऊस शेतकऱ्यांनी साखर कारखाने लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून, ऊस तोडणीनंतर थंडीच्या सिजनचा लाभ घेऊन त्या शेतात गहू, हरबऱ्याची पेरणी केली जाऊ शकेल.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जोरदार पावसामुळे आधीच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता जर हंगाम उशिरा सुरु झाला, तर त्याचा पिकांवर परिणाम होईल, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होईल. साखर आयुक्त कार्यालयाने २५ नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरु करण्यासाठी राज्य सरकार कडून शिफारस केली आहे, याचा अर्थ अजूनही कारखाने सुरु होण्यास कमीत कमी १० दिवस लागतील. जोपर्यंत ऊस तोडणी होत नाही, तोपर्यंत शेतकरी त्या शेतात दूसरे पीक घेऊ शकत नाहीत, त्यासाठीच त्यांनी साखर कारखाने लवकर सुरु करावेत अशी मागणी केली आहे. जेणेकरुन ते गहू आणि हरभऱ्याचे पिक घेऊ शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.