बेळगावीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून खत फवारणीसाठी ड्रोनचा वापर

बेळगावी : कृषी क्षेत्रातील कामगारांची टंचाई, मजुरीत झालेली वाढ या कारणांमुळे बेळगावीमध्ये शेतांमध्ये खतांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे. एका ड्रोन एजन्सीकडून सवलतीच्या दरात प्रदर्शनाचा प्रस्ताव वापरुन बेळगावी तालुक्यातील कोडोली गावातील शेतकऱ्यांनी गेल्या गुरुवारी ड्रोन मशीनचा वापर करुन आपल्या पाच एकर ऊसाच्या शेतात रासायनिक खतांची यशस्वी फवारणी केली. उत्तर कर्नाटकमधील ही पहिली फवारणी असल्याने डझनभर शेतकऱ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ही औषध फवारणी पाहून शेतकरी आश्चर्यचकीत झाले. त्यांनी आपल्या शेतातही याचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला.

खत उत्पादक कंपनी इंडस्ट्रियल फार्मर्स फर्टिलायजर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) ने चेन्नईस्थित गरुड एअरोस्पेस कंपनीसोबत मिळून शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई भासत असल्याने आणि शेतीचा खर्च कमी करण्यासाठी ड्रोन मशीन विकसित केली आहेत. शेतकरी रमेश मयानाचे यांनी आपल्या पाच एकर शेतात आयपीएससीओ द्वारे ड्रोनमधून फवारणीसाठी सहमती दर्शवली. गरुड़ एअरोस्पेसचे अश्विन यांनी ड्रोन मशीनमधून अवघ्या ५० मिनिटांमध्ये ५० लिटर रासायनिक खतांची फवारणी केली. हे काम पूर्ण करण्यासाठी पाच मजुरांना पाच दिवसांचा कालावधी लागतो. एक एकर द्रवरुप खत फवारणीसाठी केवळ दहा लिटर पाण्याची गरज भासते. त्यामुळे खते, पाणी यांचेही नुकसान कमी होते. शेतकऱ्यांचा वेळ वाचतो. अश्विन यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, आम्ही ड्रोन राज्यभर सादरीकरण आणि शेतकरी गटांना तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उपयोग सांगण्यासाठी तयारी केली आहे.

ऊस उत्पादजक मयानचे यांनी हिंदूस्थान टाइम्सला सांगितले की, एजन्सीने एक एकर शेतावर फवारणीसाठी ३०० रुपयांची आकारणी केली. पाच एकरसाठी फक्त १५०० रुपये द्यावे लागले. हा ड्रेमो ट्रायल असल्याने त्यांनी ६०० रुपये स्वीकारले. यापूर्वी फवारणीसाठी पाच कामगारांची गरज भासत होती. त्यांना प्रती दिन ४०० रुपये मोजावे लागत होती. एकूण दहा हजार रुपये खर्च येत होता. आता जवळपास नऊ हजार रुपयांची बचत होईल.

रमेश यांनी सांगितले की, ड्रोनच्या वापराने फक्त वेळच नव्हे तर पैसेही वाचले आहेत. डझनभर शेतकरी औषध फवारणीसाठी ड्रोनची फवारणी करू इच्छितात. आम्ही सर्व पिकांसाठी ड्रोनचा वापर करू इच्छितो. रमेश यांनी सांगितले की, आम्ही इफ्को कंपनीच्या डीएपी, युरीयासारख्या नॅनो खतांचा वापर करीत आहोत.

बेळगावी तालुक्यातील पंत बाळेकुंद्री गावातील १० एकर जमिनीचे मालक मंजुनाथ चिकमथ यांनी सांगितले की, अनेक कारणांनी युवक शेती सो़डत आहेत. कामगारांची टंचाई हे यातील एक कारण आहे. आता ड्रोन मशीन हे यासाठी वरदान ठरणारे आहे.

बियाणे, खते, कृषी उपकरणे आदींचा पुरवठा करणारी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघाचे अप्पन्ना देसाई म्हणाले की, ड्रोन मुळे आमच्याकडे एक सशक्त पर्याय आला आहे. ते शेतीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ड्रोनचा वापर यशस्वी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी गरुड एअरोस्पेस एजन्सीला आपल्या शेतामध्येही फवारणीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here