कोरोनाच्या संकटात अडकले नेपाळ मधील ऊस  शेतकरी

काठमांडू : कोरोना वायरस महामारी मुळे नेपाळ चे ऊस  शेतकरी अधिकच संकटात सापडले आहेत. लॉकडाउनमुळे शेतकर्‍यांचे ऊस  अजूनही शेतातच आहेत. तसेच शेतकर्‍यांची थकबाकीही भागवलेली नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. नेपाळमध्ये ऊस  तोडीचा हंगाम साधारणपणे जानेवारी ते मार्चपर्यंत असतो. पण यंदा शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरलाही येथील ऊस  शेतकरी राजेश यादव यांनी सांगितले की, साखर कारखाने चालू नसल्याने प्रथम आम्ही थकबाकी भागवण्याचा विरोध करत होतो. शेतकरी द्वीधा मनस्थितीत होते, की शेतातील ऊस  तोडावा की नाही. पण जेव्हा साखर कारखान्यात काम सुरु झाले, तेव्हा सकराने कोरोना संक्रमणापासून बचावासाठी लॉकडाउन लागू केले. यामध्ये शेतकरी अडकले. ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वीच ऊसाचे गाळप केले होते, त्यांनाही लॉकडाउनमुळे त्यांचे पैसे मिळाले नाहीत.
यादव म्हणाले, ऊस  शेतकरी साखर कारखान्यांकडून पैसे मिळावेत यासाठी शेतकर्‍यांनी निदर्शने केली. ते काठमांडूला गेले आणि सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंतीही केली. पण कोरोना संकटामुळे त्यांना विरोध सोडवा लागला. ही शेती हेच आमच्या अस्तित्वाचे साधन आहे. आणि आम्ही आमच्या उत्पादनाला नष्ट करु इच्छित नाही. यासाठी आम्ही आमचा ऊस  कारखान्याला दिला आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here