उत्तर प्रदेश: ऊस पिकावर पायरिला किडीचा फैलाव वाढण्याचा धोका

अमरोहा : विभागात ठिकठिकाणी पायरिला किडीचा फैलाव दिसून येत आहे. या किडी उसाच्या पानांचा रस शोषून घेत आहेत. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. किडीचा फैलाव गतीने होत आहे. उसासह मक्का, बाजरी, ज्वारी या पिकांवरही किडीचा फैलाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पायरिला किडीला नियंत्रीत करणारे मित्र किटक काही शेतांमध्ये दिसून येत आहेत. शेतकरी या किडींचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणी करीत आहेत. मात्र काहीच ठिकाणी अशी फवारणी सुरू आहे. त्यामुळे इतरत्र किडीचा फैलाव वाढणार आहे.

जिल्हा कृषी अधिकारी राजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, मे महिन्यात पायरिला किडीचा फैलाव दिसून येत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी किटकनाशकाचा फैलाव करण्याची गरज नाही. शेतामध्ये ओल कायम राहिल याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. पावसानंतर ही किड नियंत्रणात येऊ शकेल. किड नष्ट करणारे परजीवी किटकही दिसून येत आहेत, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here