हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
शेतकरी हे नाव जरी एकदा घेतला तर राजू शेट्टी यांचंच नाव येत पण या लोकसभे मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. हातकलांगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात सरळ सामना झाला भाजपची वाढलेली ताकद, चार आमदार व एका राज्यमंत्र्याने राबविलेली यंत्रणा याचा फायदा धैर्यशील माने यांना झाला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अजेंडा घेऊन लढणाऱ्या राजू शेट्टींनी 2009 आणि 2014 च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता पण या वेळी त्यांना हार पत्करावी लागली. वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना जोराचा फटका बसला. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अन्वर याना १ लाख १८ हजार मते मिळाली. यामुळे निकालाला कलाटणी मिळाली. तर राजू शेट्टी यांना ४,७२,९२१ मते मिळाली आणि धैर्यशील माने यांना ५,६८००४ मते मिळवोन विजयी झाले .