अमरावती: अमरावतीतील ताडेपल्ली येथील ऊस आयुक्त कार्यालयासमोर ऊस शेतकर्यांनी निदर्शने केली. ऊस गाळप करुनही दोन वर्षे झाली, तरीही शेतकर्यांना पैसे मिळाले नसल्याने त्यांनी ही थकबाकी त्वरीत मिळावी अशी मागणी केली. तसेच ही थकबाकी 15 टक्के व्याजानुसार द्यावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
2019-20 या हंगामासाठी शेतकरी ऊसाच्या प्रति टन 4000 एफआरपी द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी बोर्ड व्यवस्थापनाला केली आहे.
ऊस गाळप करुनही बोर्ड व्यवस्थापनाने ऊसाचे पैसे दिलेले नाहीत, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे. 1964 च्या ऊस कायद्यानुसार, ऊस गाळपानंतर 15 दिवसात शेतकर्यांचे पैसे देण्यात यावेत असा नियम व्यवस्थापन पाळत नाही, असेही शेतकर्यांनी स्पष्ट केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.