सांगली : सध्या सहकारी साखर कारखान्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व सर्व संबंधित घटकांनी कारखान्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले. अध्यक्ष पाटील यांनी बावची, पोखर्णी, ढवळी, नागाव, भडकंबे, कोरेगाव व शिगाव या गावांचा संपर्क दौरा केला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान दिलेले आहे. या कारखान्यांसमोरील अडचणीच्या काळात मदत मिळायला हवी. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस राजारामबापू पाटील साखर कारखान्याला पाठवून गाळप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष विजय पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बबन थोटे, वैभव रकटे, प्रशांत पाटील, सुजय पाटील, गट अधिकारी प्रणिल पाटील, श्रीधर चव्हाण, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव, सुरेश पाटील, बी. के. पाटील, बाळासाहेब कोकाटे, लालासाहेब पाटील, व्यंकटराव पाटील, शरद पाटील, उदय पाटील, प्रताप मधाळे उपस्थित होते.