शेतकऱ्यांना एफआरपी मिळणार कमी

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाब

शेतकऱ्यांना एफआरपी मिळणार कमी

पुणे : चीनी मंडी

राज्यातील तब्बल ५९ साखर कारखान्यांची साखर उताऱ्याची (रिकव्हरी) सरासरी दहा टक्क्यांपेक्षाही कमी आली आहे. विशेष म्हणजे यातील ११ साखर कारखान्यांना ९ टक्के उताराही गाठता आलेला नाही. त्यामुळे या कारखान्यांना एफआरपीचा टक्का गाठताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी साखर उतारा हा एक महत्त्वाचे प्रमाण असते. राज्यात १९३ साखर कारखान्यांमध्ये यंदा उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात १५ फेब्रुवारी पर्यंत ७५७.२८ लाख टन ऊस गाळपातून ८२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी उतारा हा १०.९६ टक्के आहे. पण, यातील काही साखर कारखान्यांना १० टक्केही उतारा गाठता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.

केंद्र सरकारने एफआरपी ठरवताना १० टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटलचा २७५० रुपये दर जाहीर केला आहे. पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये, असा दर आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के आहे. त्यामुळे सरासरी एफआरपी देखील ३ हजार रुपयांच्या आसपास जाते. त्यामुळेच सरकारने साखरेची किमान विक्री किंमत २९०० रुपयांवरून ३१०० रुपये केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.

साखर उतारा सरसरी ८ ते ९ टक्के आणि ९ ते १० टक्क्यांदरम्यान असलेल्या कारखान्यांना एफआरपीचा आकडा गाठण्यासाठी अधिक कसरत करावी लागेल. तर, ८ ते साडेआठ टक्के साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांना तोटाही होऊ शकतो.

नऊ टक्क्यांपेक्षा खाली उतारा असलेले कारखाने

कारखाना                टक्का

अंबाजी (बेलगंगा)-जळगाव    ३.७४

साईबाबा-लातूर            ८.८६

सागर वाईन-यवतमाळ        ८.०२

महात्मा-वर्धा            ८.९१

लोकमंगल माऊली-उस्मानाबाद ८.३६

जयलक्ष्मी शुगर्स-उस्मानाबाद    ८.०५

साईकृपा-२ अहमदनगर        ७.७४

केजीएस शुगर-नाशिक        ८.६८

लोकमंगल अ‍ॅग्रो-सोलापूर    ८.३४

लोकमंगल शुगर-सोलापूर    ८.२३

माणगंगा-सांगली            ३.६७

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here