संभल (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची पावती न दिल्याप्रकरणी, भारतीय किसान युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान झाले नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस देताना येत असलेल्या अडचणी त्यांनी मांडल्या.
साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांना ऊस जमा केल्याची पावती एसएमएसवर देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आपला मोबाइल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि ओळखपत्र कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर घेऊन करायचे आहे. तरच शेतकऱ्याच्या उसाचे वजन केले जाणार आहे. मात्र, सगळ्याच शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याच्यावरील एसएमएस वाचता येत नाहीत. साखर कारखाना आणि सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक नोंदणी केलेले नाहीत. अनेक शेतकरी गावाबाहेर नोकरी करत आहेत. तर, काही जण वृद्ध असल्याने त्यांनी शेती भाडे तत्वावर चालवायला दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आदेशामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना जाग्यावरच पावती करून देण्यात यावी आणि नवा नियम लागू करू नये, अशी मागणी युनियनच्या सदस्यांनी केली. या संदर्भात तातडीने निर्णय झाला नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीन युनियनने दिला आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp