कैथल : ऊस दरात वाढ न झाल्यामुळे हरियाणातील शेतकरी नाराज आहेत. भारतीय शेतकरी संघ (भाकियू) यांच्या उपस्थितीत शेतकर्यांची साखर कारखान्यात बैठक झाली. यामध्ये साखर कारखान्यांना सांगण्यात आले की, जर सरकारने ऊस दरात वाढ केली नाही तर, संघाचे सदस्य साखर कारखान्यांना कुलूप घालतील. ऊस शेतकर्यांनी सरकारला 14 जानेवरीपर्यंतचे अल्टीमेटम दिले आहे. सरकारने ऊस दरात वाढ केली नाही तर, 15 जानेवारीला कारखान्याच्या गेटला शेतकर्यांकडून कुलूप घातले जाईल.
भारतीय शेतकरी संघाच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठक़ीत हा निर्णय घेण्यात आला. संचालन संघाचे प्रदेश युवा प्रमुख गुलतान सिंह नैना यांनी सांगितले की, संघाने राज्य सरकारला याबाबत निवेदने दिली आहेत, पण सरकारला याबाबत गांभीर्य नाही. शेतकर्यांच्यात यामुळे नाराजी आहे.
त्यांनी आरोप केला की, शेतकर्यांना त्यांच्या ऊसाची योग्य किंमत न मिळणे हा अन्याय आहे. सरकार शेतकर्यांविरोधी आहे. नवे नवे निर्णय घेवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.