राज्याचे साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद शाहजहाँपूरच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी ऑनलाइन बियाणे बुकिंग व्यवस्था कायमस्वरुपी सुरू राहावी. तसेच शरद ऋतू आणि वसंत ऋतुमध्ये बियाण्यांची उपलब्धता त्यांच्या जवळच्या केंद्रामध्ये करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी कृषी विभागाच्या वेबसाइटवर आपल्या गरजेनुसार बियाण्याचे बुकिंग करू शकतात.
अप्पर मुख्य सचिवांनी ऊस संशोधन परिषदेच्या संलग्न केंद्रांवर उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध प्रजातीच्या बियाण्यांचा आढावा घेतला. त्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यावर त्यांनी भर दिला. नव्या प्रजातीच्या बियाण्यांचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ऊस संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीदरम्यान, ऊस शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि पर्यावरणासाठी सुरक्षित शेतीला प्राधान्य देण्यासाठी जैव उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देताना अप्पर मुख्य सचिव म्हणाले की, पावडर पद्धतीसह जैव उत्पादनांचा वापर अधिक केला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना त्याच्या वापरात सुलभता येईल. लाल सड रोग रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा जैव उत्पादने तसेच टॉप बोरर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायडोकाड्चे उत्पादन वाढवावे असे निर्देश त्यांनी दिले.
माती परीक्षण तथा आरोग्य कार्ड वितरणाचा आढावा घेताना अप्पर मुख्य सचिवांना दिसून आले की, ऊस संशोधन परिषद सेवराही व मुजफ्फरनगरचे काम खूप संथ आहे. येथील काम गतीने करण्याची सूचना देण्यात आली.
ऊसावरील टॉप बोरर किडीच्या नियंत्रणासाठी भुसरेड्डी यांनी ट्रायकोकार्डच्या उत्पादनावर विशेष भर देताना सांगितले की, ऊस संशोधन संस्थेद्वारे अधिकाधिक महिला स्वयंसहाय्यता गटांना ट्रायकोकार्ड उत्पादनासाठी प्रशिक्षण दिले जावे. आणि गटाना यात सहभागी करून घ्यावे. भुसरेड्डी यांनी आढावा बैठकीत सांगितले की, सर्व केंद्रांवरील प्रयोगशाळांमध्ये अत्याधुनिक ऑटोमेटेड उपकरणांचा वापर करावा. त्यातून कामाला गती येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होवू शकेल.
आढावा बैठकीस उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेचे विशेष सचिव शेषनाथ, शाहजहाँपूर ऊस संशोधन परिषदेचे संचालक अपर ऊस आयुक्त व्ही. के. शुक्ल, डॉ. एस. के. शुक्ल आदी उपस्थित होते.