मुजफ्फरनगर: ऊस विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्व माहिती मिळावी यासाठी ई -ऊस ऍप लॉन्च केले आहे. या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या घरी बसूनच ऊसा संदर्भात सर्व माहिती मिळेल. शेतकऱ्यांना यासाठी विभागाच्या वेबसाइट वर जाऊन ई -ऊस प्रणालीवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर ते लिंक वरुन ई -ऊस ऍप डाऊनलोड करु शकतील.
हे शेतकरी आपले गाव, शेतकरी कोड आणि ऊसाशी संदर्भातील बाबी भरुन माहिती घेऊ शकतात आणि आपल्या इतरही अडचणीं बाबत विभागाचा टोल फ्री नंबर 1800-121-3203 यावर संपर्क साधू शकतात. या ऐपला प्ले स्टोअर वरुन शेतकरी अतिशय सोप्या पध्दतीने आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करु शकतात.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.