मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश सरकारने साखर कारखान्यांच्या संचालकांना 30 ऑक्टोंबरपर्यंत ऊस शेतकर्यांची थकबाकी देण्याचे निर्देश दिले आहेत. ही थकबाकी दिली नाही तर, वसुली प्रमाणपत्र जारी करुन, गोदामांमध्ये असणारी अतिरिक्त साखर विकून ऊस शेतकर्यांची थकबाकी भागवली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री सुरेश राणा यांनी शामलीमध्ये झालेल्या बैठक़ीत दिली.
बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन ऊस शेतकर्यांच्या याचिकेवर सुनावणी करुन सरकारला ऊस शेतकर्यांची थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले होते. याचिकेमध्ये शेतकर्यांनी म्हटले होते की, त्यांनी बँकांकडून कर्ज घेवून ऊसाचे उत्पादन केले आहे. जर साखर कारखान्यांनी शेतकर्यांची देणी दिली नाहीत, तर ते बँकांचे कर्ज कसे भागवणार.
राणा म्हणाले की, सहारनपूर जिल्ह्यात एकूण 17 साखर कारखाने आहेत. यामध्ये तिकोला आणि मनसूरपूर यांनी शेतकर्यांची देणी भागवली आहेत. तर, सरसावा, देवबंद आणि नानोता यांनी 90 टक्के देणी भागवली आहेत. मुजफ्फरनगर चे ऊस अधिकारी आर.डी. द्विवेदी यांनी सांगितले की, जिल्ह्यात शेतकर्यांचे अजूनही 318.13 करोड देय आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.