लखनौ : रमाला साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन 4 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रमाला साखर कारखान्याची उत्पादन क्षमता आता इतकी वाढली आहे की, पुढच्या तीस वर्षांपर्यंत ऊस शेतकर्यांना ऊस विक्रीसाठी भटकावे लागणार नाही. कारखान्याची गाळप क्षमता 2750 टीसीडी हून वाढून 5000 टीसीडी इतकी झाली आहे. ते म्हणाले की, कारखान्यात 27 मेगावॅट विज निर्मिती करण्यात येणार आहे. ही विज विकून शेतकर्यांची उर्वरित थकबाकी भागवली जाईल.
योगी म्हणाले की, राज्यातील शेतकर्यांचे इनकम दुप्पट करण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे. देशातील शेतकरी आणि युवक सुखी रहावेत, अशी इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. राज्यात औद्योगिक विकासामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. कारखान्याच्या उद्घाटनानंतर योगी शेतकर्यांशी बोलत होते. ते म्हणाले की, पहिल्यांदा राज्यात विकासाचा अभाव होता, त्यामुळे युवकांना रोजगारीसाठी बाहेरच्या राज्यात जावे लागत होते. पण आता इथेच सार्या सुविधा आहेत. ते म्हणाले की, गेल्या वर्षी इथे 119 कारखाने काम करत होते.
यावर्षी आणखी तीन साखर कारखाने सुरु होत आहेत. यामुळे युवकांना अधिकाधिक रोजगार मिळतील. उत्तर प्रदेश सरकार शेतकर्यांना ऊसाचे चांगले पैसे मिळावेत यासाठी ठोस पावले उचलत आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले, रमाला साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाची शेतकर्यांची मागणी गेल्या 30 वर्षांपासून होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे शेतकरी नाराज होते. पण आता ते अधिकाधिक ऊस लागवड करतील, ज्यामुळे यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती करता येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.